महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरूवात, Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Free Gas Cylinder Announcement

Majhi Ladki Bahin Yojana Free Gas Cylinder : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुद्धा महिलांसाठी खूपच फायदेशीर योजना आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत सरकारकडून उज्वला योजनेच्या व माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर वर्षाला तीन मोन्फत गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Women beneficiaries of Majhi Ladki Bahin Yojana and Ujjwala Yojana will now receive three free gas cylinders yearly under Annapurna Yojana. Learn how to claim the benefits).

महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. आता या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ज्या महिला पीएम उज्वला योजनेसाठी आणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, त्या महिलांना आता मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरूवात झाली आहे.

🔴 हेही वाचा 👉 दोनदा मिळणार मोफत गॅस सिलेंडर.

अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर आहेत त्यामुळेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेक महिलांना अडचणी येत आहेत. अशावेळी तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजेसाठी पात्र असाल तर अशा कुटुंबांतील महिलांनी गॅस सिलेंडर स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांना कोणतीही अडचण येणार नाही.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now