Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता पर्यंत 1 कोटिहून जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट असे दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत.
राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर अनेक महिलांनी लगेच अर्ज केला. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाहीत, अशी शंका असल्याने बहुतांश महिलांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्यावर अर्ज करण्यासाठी महिलांची गर्दी वाढली.
पण, माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत? अशी तक्रार घेऊन अनेक महिला सेतू केंद्र, आणी बँकेत गर्दी करत आहेत. बैंक खाते आधारशी लिंक नसणे हे महत्वाचे कारण बँकेकडून सांगण्यात येत आहे. आणी खात्यात पैसे जमा न झालेल्या अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यायला सांगितले जात आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजुर झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी आधार बँकेशी लिंक असणे गरजेचे होते. त्यामुळे बँकेशी आधार लिंक झाल्यानंतर अर्ज मंजूर असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले.
तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसल्यास तुमचे आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासा
बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. लिंक नसल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तुमचे ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करा.
बँक सिडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तुमचा आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून लॉगीन करा आणी आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन तुमचे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते चेक करा.
आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.