Majhi Ladki Bahin Yojana New List Check Online : जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात होते. आता ती दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढून 2100 करण्यात येत आहे. (Check if your name is in the latest Majhi Ladki Bahin Yojana list for monthly ₹2100 assistance. Learn how to check the status online and download the beneficiary list easily).
Majhi Ladki Bahin Yojana List Name Check : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन यादी (List) जाहीर केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने 28 जून रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार आणि अविवाहित महिलेला दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता नव सरकार स्थापन होताच ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्य सरकारने एक नवीन यादी जारी केली आहे. या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही आणि तुमच्या बँक खात्यात 2100 जमा होतील की नाही हे तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता. माझी लाडकी बहिण योजनेची नवीन यादी तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
पाहिला पर्याय म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन यादीत तुमच नाव चेक करण. तुम्ही जर ऑफलाइन अर्ज केला असेल, तर तुम्ही नगरपालिका, पंचायत, महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाची स्थिती आणि माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट चेक करु शकता.
जर तुम्ही Narishakti Doot ॲप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून माझी लाडकी बहिण योजना स्टेटस चेक आणि माझी लाडकी बहिण योजना लिस्ट घरबसल्या चेक करु शकता.
नारीशक्ती दूत अॅप ओपन करा. अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर खाली ‘या पूर्वी केलेले अर्ज’ पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज तुम्हाला दिसतील. यावर क्लिक करा. आणी तुमच्या समोर तुमचा अर्ज ओपन होईल. येथून तुम्ही स्टेटसमध्ये जाऊन Majhi Ladki Bahin Yojana Status Check करु शकता.
जर तुम्ही वेबसाइटद्वारे अर्ज केला असेल तर ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून वेबसाइटवर लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर मेन्यूमध्ये असणाऱ्या ‘Application Made Earlier’ पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुमचा अर्ज, अॅप्लिकेशन नंबर आणि Ladki Bahin Yojana Status दिसेल. याप्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन माझी लाडकी बहीण योजना यादी (Majhi Ladki Bahin Yojana List) चेक करु शकता.
त्याचबरोबर तुम्ही तुमच्या शहराच्या महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी तपासू शकता. तुमच्या शहराच्या महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट ओपन करा आणी त्यावर दिसत असणाऱ्या माझी लाडकी बहिण योजना लिस्टवर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला तुमचा वॉर्ड निवडावा लागेल.यानंतर तुम्हाला डाउनलोड बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लिस्टची पीडीएफ (Majhi Ladki Bahin Yojana New List Pdf Download) डाउनलोड होईल.
🔴 हेही वाचा 👉 या तारखेपासून महिलांना मिळणार 2,100 रुपये! समोर आली तारीख.