महिलांच्या खात्यात कधी जमा होणार 4500 रुपये? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले Majhi Ladki Bahin Yojana Next Installment

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date September Update (फोटो: सोशल मीडिया)

Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या राज्यातील 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट दोन महिन्याची रक्कम 3000 रुपये जमा करण्यात आलेली आहेत. 31 जुलै नंतर ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये कधी जमा होणार हा प्रश्न महिलांकडून विचारला जात होता. स्वतः (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचं उत्तरं दिल आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date September Update).

कोल्हापूर (Kolhapur) येथे जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम (फोटो: सोशल मीडिया)

या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात आम्ही लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या दरमहा 1500 रुपयांच्या रकमेत वाढ करणार आहोत.

राज्यातील 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेत सहभाग नोंदवला असून यातील 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना सरकारकडून दोन महिन्यांचे पैसेही वितरीत करण्यात आले आहेत. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरूवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आत्ता पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे?

राज्यातील महिलांना अर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना दिला आहे. तसेच सप्टेंबरअखेर सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यासाठी शासनाकडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे. या माहितीनुसार, ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे आणी ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणी सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 4500 रुपये सप्टेंबरअखेर जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article