Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Received : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला असेल. तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असेल तरीही तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा नसतील तर ही माहिती तुच्यासाठी आहे. (Majhi Ladki Bahin Yojana: Aadhaar Linked to Bank Account, but Payment Not Received? Read This)…
1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अनेक महिलांनी लगेचच अर्ज दाखल केला. आता 14 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले. मात्र अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांनी बँकेकडे धाव घेऊन बँकेत पैसे जमा झाले नसल्याबद्दल चौकशी केली. आधार बँक खाते लिंक असल्याची चौकशी केली. नसलेल्या महिलांनी आधार बँक खात्याशी लिंक देखील करून घेतले. पण तरीही खात्यात पैसे का जमा झाले नाहीत? हा प्रश्न अनुत्तारितच राहिला.
अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी करून त्यातून पात्र महिलांचे अर्ज मंजुर केले आणी त्यानंतर पात्र महिलांच्या नावाची लाभार्थी यादी बनवून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले.
तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणी तुमचा अर्ज मंजूर होऊन अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही अर्ज केलेली तारीख तपासा. सध्या 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले असून. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 अंशत: रद्द अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा तातडीने दाखल करा.
त्यामुळेच तुम्ही जर 1 ऑगस्ट किंवा त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. 1 ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांनी त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करावी ते नसल्यास आधार बँक लिंक करून घ्यावे. असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.