Mazi Ladki Bahin Yojana Bank Account: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना बँक खात्यासंबंधी एक जरी चूक केली तर तुम्हाला योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Bank Account: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नवीन सरकारी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळेच रोज मोठ्या संख्येने अर्ज केले जात आहेत. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अजून अर्ज केला नसेल तर ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडून एक चूक झाली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
Majhi Ladki Bahin Maharashtra योजनेचा अर्ज भरताना तुमच्याकडून घाईत ही एक चूक होऊ देऊ नका, नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत बोलताना बँक खात्याविषयी काही सूचना दिल्या आहेत. अर्ज भरताना तुम्ही जो आहे तो याशिवाय अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे. याशिवाय बँकेचं नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना बँकेचे नाव, बँकेची शाखा, तुमचा बँक अकाउंट नंबर आणि बँकेचा IFSC कोड व्यवस्थित भरा. बँक डिटेल्स भरताना काही चूक झाली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.
Mazi Ladki Bahin Yojana Form मध्ये बँकेसंबंधी कोणकोणती माहिती भरायची?
– बँक खातेधारकाचे नाव
– बँक खाते क्रमांक
– IFSC कोड
– बँकेचे पूर्ण नाव आणि शाखेचे नाव
- *टीप: (आपण जो बँक खाते नंबर अर्जात लिहीत असाल त्या बँकेच्या खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. ते असल्याची खात्री करा. नसल्यास आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या).
योजनेच्या अर्जात बँक तपशील भरून झाल्यावर ती माहिती पुन्हा एकदा तपासून बरोबर असल्याची खात्री करा. योजनेच्या अर्जामध्ये ही माहिती बिनचूक भरली असेल तरच पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतील.
🔴 हे वाचलं का? 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादीत नाव आले नाही? तर अशी नोंदवा तक्रार.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?
सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस पात्र महिलांची सरकारकडून यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्या महिलांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट असतील त्या महिलांच्या बँक खात्यात योजनेच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम 15 ऑगस्टला जमा केली जाईल.