Ayushman Bharat Vaya Vandana Card Download : पंतप्रधान मोदींच्या आयुष्मान भारत या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची पर्वा न करता उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वृद्ध नागरिकांना 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हर दिले जाईल. जे आर्थिकदृष्ट्या उपचाराचा मोठा खर्च करू शकत नाहीत किंवा ज्यांचा आरोग्य विमा नाही अशा जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना खुपच फायदेशीर आहे. (Register for Ayushman Bharat Vaya Vandana Yojana and get ₹5 lakh health coverage for free treatment. Learn how senior citizens can download the Vaya Vandana card and benefit).
नोंदणी कशी करावी?
ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) पोर्टल beneficiary.nha.gov.in किंवा आयुष्मान ॲपद्वारे या योजनेसाठी सहजपणे नोंदणी करू शकतात. यानंतर, लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत ‘वय वंदना’ कार्ड (Ayushman Bharat Vaya Vandana Card) बनवले जाईल, जे त्यांना रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा देईल.
रुग्णालयांमध्ये उपचारांची परिस्थिती
आयुष्मान भारत योजनेचा लाभ फक्त सरकारी आणि निवडक खाजगी रुग्णालयांमध्येच घेता येईल. वर्षानुवर्षे एखाद्या विशिष्ट डॉक्टरांकडून उपचार घेत असलेल्या वृद्ध लोकांना त्यांच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या रुग्णालयात किंवा जवळच्या सूचीबद्ध रुग्णालयात मोफत उपचार घेता येईल.
आरोग्य पॉलिसी धारकांना दिलासा
ज्यांच्याकडे आधीच आरोग्य विमा आहे ते ही योजना बॅकअप कव्हर म्हणून वापरू शकतात. विशेषत: जास्त उत्पन्नामुळे स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी असलेले ज्येष्ठ नागरिक अतिरिक्त संरक्षण म्हणून आयुष्मान भारत ‘वय वंदना’ योजनेची निवड करू शकतात.
योजनेचा लाभ कोणाला होणार?
रक्तदाब, मधुमेह यासारख्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या वृद्धांना या योजनेद्वारे मोफत उपचार घेता येणार आहेत. ज्यांना आरोग्य विमा परवडत नाही किंवा त्यांच्या सध्याच्या पॉलिसीमध्ये पुरेसे कव्हर नाही त्यांच्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरेल.