Majhi Ladki Bahin Yojana Benefit Recovery Dhule Action, 4 जानेवारी 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. धुळे जिल्ह्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका महिलेकडून सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेतल्याने 7,500 रुपये परत घेण्यात आले आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana: Action begins against ineligible beneficiaries. In Dhule, ₹7,500 recovered from a woman for misusing the scheme. Know the latest updates).
लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे उल्लंघन केल्यास परतावे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू करताना अर्जदारांसाठी ठराविक निकष निश्चित करण्यात आले होते. मात्र, निवडणूक काळात काही निकष डावलून अर्ज मंजूर करण्यात आले. महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर या अर्जांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अर्ज तपासणीसाठी समित्या गठित केल्या असून अपात्र ठरलेल्या अर्जदारांकडून लाभाची रक्कम परत वसूल केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील प्रकरण
Dhule News: धुळे जिल्ह्यातील एका महिलेने माझी लाडकी बहीण योजनेचा तसेच अन्य एका शासकीय योजनेचा लाभ घेतला होता. चौकशीत या महिलेने लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे तिच्याकडून पाच महिन्यांची मिळालेली रक्कम म्हणजेच एकूण 7,500 रुपये सरकारजमा करण्यात आले. सरकारकडून आता गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत.
इतर जिल्ह्यांतील तक्रारींवरही होणार कारवाई
धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर या जिल्ह्यांतून अपात्र लाभार्थ्यांविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे संबंधित सर्व अर्जांची सखोल तपासणी केली जाईल. केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना निकषांनुसार लाभ मिळेल, मात्र निकष डावलून लाभ घेतल्यास रक्कम परत वसूल केली जाईल.
🔴 हेही वाचा 👉 काही लाडक्या बहिणींना आता मिळणार 1500 रुपयांपेक्षा कमी रक्कम – अदिती तटकरे.
महिलांसाठी सरकारचा संदेश
सरकारने अपात्र महिलांनी स्वतःहून रक्कम परत करण्याचे आवाहन केले आहे. योजनेचा अपवापर टाळण्यासाठी महिलांनी पात्र नसूनही लाभ घेतला असल्यास प्रामाणिकपणे पैसे परत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेतला असेल, तर आपले निकष तपासा.
माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना मदत मिळावी हा सरकारचा उद्देश आहे. मात्र, निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांविरोधात कठोर पावले उचलली जातील.
🔴 हेही वाचा 👉 आज 4 जानेवारी 2025 रोजीचा सोन्याचा भाव.