How To Apply For Ayushman Card For 70 Years Old : भारत सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेशी सध्या मोठ्या संख्येने लोक जोडले जात आहेत. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीस वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याची तरतूद आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक घोषणा करून देशातील सर्व 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना दिवाळीची भेट दिली आहे, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ही घोषणा. (Learn how citizens above 70 years can apply for Ayushman Bharat health insurance for free medical coverage up to 5 lakhs. Follow the simple registration process online).
Ayushman Card Above 70 Years Online Apply : पूर्वी आयुष्मान भारत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी होत्या जसे की त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शिवाय सरकारी नोकरी असू नये इत्यादी. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन घोषणेनुसार सत्तर वर्षे किंवा सत्तरहून अधिक वयाचा सर्वच वृद्धांना आता आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचा मोफत वैद्यकीय विमा मिळणार आहे. जेणेकरून त्या वृद्धांच्या घरच्यांना त्या वृद्धांवर वैद्यकीय उपचार करताना आर्थिक बोज येणार नाही. त्यामुळे वृद्ध लोकांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही या योजनेमुळे खूप मदत होणार आहे.
वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्यविमा
आयुष्मान भारत आरोग्य विमा (AB PMJAY) अंतर्गत एका कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्यविमा मिळतो म्हणजेच कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च हा या योजनेअंतर्गत विमा कंपनीद्वारे कव्हर केला जातो.
योजनेत आधीच सामील असलेल्यांसाठी टॉप-अप कव्हर
आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत आधीच कव्हर केलेले म्हणजे या योजनेचा लाभ घेत असलेले ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ५ लाख रुपयांचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल. यामुळे उपचाराचा खर्च 5 लाख रुपयांपेक्षा जास्त झाला तरीही तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तथापि, या योजनेत आधीच समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकतर त्यांची चालू योजना सुरू ठेवावी लागेल किंवा नवीन आयुष्मान भारत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, म्हणजे त्यांना दोन्हीपैकी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
असा करा अर्ज
जर ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना प्रथम PMJAY पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. किंवा, ते आयुष्मान ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्यावर नोंदणी करू शकतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधीच आयुष्मान भारत कार्ड आहे त्यांना टॉप-अप कार्ड मिळविण्यासाठी पोर्टल किंवा ॲपवर पुन्हा नोंदणी करावी लागेल. आता शासनाने नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे.