Majhi Ladki Bahin Yojana Latest News | माझी लाडकी बहीण योजना Latest News : जुलै महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते पण महायुतीमधील एका बड्या नेत्याने निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 3000 रुपयांची आर्थिक मदत केली जावी अशी मागणी करणार असल्याच सांगितल आहे. महायुतीतील एका बड्या नेत्याच्या या मागणीमुळे चर्चांना उधाण आल आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana may increase monthly aid to Rs 3000 from December 2024, as demanded by a prominent leader in Maharashtra. Discover the latest updates on this scheme).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सबंध राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेसाठी जवळपास 2 कोटी 80 लाख महिलांनी अर्ज केले व त्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर निवडणूक संपताच सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. अशातच महायुतीतील एका बड्या नेत्याने लाडकी बहीण योजनेचा सध्या देण्यात येत असलेला 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 3000 रुपये करण्याची मागणी करण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
महायुतीतील आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मदत मिळावी, अशी मागणी सरकारमध्ये आल्यावर करणार असल्याच म्हटल आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आता निवडणुकीनंतर दर महिन्याला खरच 3000 रुपये मिळतील का? ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या देण्यात येत असलेल्या हफ्त्याच्या रकमेत हळूहळू वाढ करणार असल्याच यापूर्वीच सांगितलं होत.