Majhi Ladki Bahin Yojana News : तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता जमा होण्यास कोणती अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला काही कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. तरच डिसेंबर महिन्यात तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता जमा जमा होईल. (Majhi Ladki Bahin Yojana latest update: Women who have newly registered must complete KYC and Aadhaar seeding promptly to ensure seamless deposit of the December installment. Avoid delays in receiving financial aid by updating your bank details on time).
Majhi Ladki Bahin Yojana New Registration: राज्यात जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. व पात्र महिलांच्या बँक खात्यात 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तर डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी नवीनच अर्ज केला असेल व पुढच्या हफ्त्यावेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला काही कामे एका महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा अनेक महिला पात्र असूनही त्यांचे ‘आधार सिडिंग’ नसल्याने त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले न्हवते. लाडक्या बहिणींचे अनुदान बँकेला ‘आधार सिडिंग’ नसल्याने थांबवण्यात आल्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला होता. हे समजताच बँकांमध्ये महिलांची केवायसी, आधार सिडिंगसाठी मोठी गर्दी झाली. मात्र त्यामुळे, अनेकवेळा ‘सर्व्हर डाऊन’ असल्याने बँकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता व त्यामुळे महिलांना बँकांमध्ये पायपीट करण्याचा त्रास सहन करावा लागला होता.
सध्या बँकांमध्ये गर्दी नसल्याने ‘आधार सिडिंग’, केवायसीचे काम वेळीच पूर्ण करून घा. म्हणजे डिसेंबर महिन्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होताच तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणती अडचण येणार नाही. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश येऊनही ते पैसे काढता येत नाहीत असे तुमच्यासोबत घडणार नाही.