या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ Majhi Ladki Bahin Yojana Latest News

4 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra List Of Ineligible Beneficiaries 2024

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल तर नवीन अर्ज करण्यापुर्वीच जाणून घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मीळेल की नाही. (Majhi Ladki Bahin Yojana provides financial aid to eligible women in Maharashtra. Find out the list of ineligible beneficiaries to know if you qualify for this scheme).

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्रात 1 जुलैपासून 2024 पासून या योजनेची अंमलबजाणी सुरु झाली असून आत्तापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. आणी आता ही 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. तुम्ही जर आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केलात तर तुमचा अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासून तुमच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा होतील.

🔴 हेही वाचा 👉 दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही….

पण या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत. म्हणजेच राज्यातील प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही उत्पन्न मर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. पण नवीन शासन निर्णय जारी झाल्यानंतरच 2.5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.

🔥 या योजनेअंतर्गत बचतगटातील महिलांना मिळते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी त्वरित कर्ज Sarkari Yojana For Ladies.

खालील यादीत जर तुमचा समावेश असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. (Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra List Of Ineligible Beneficiaries 2024).

Majhi Ladki Bahin Yojana – Ineligible Beneficiaries
ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल
लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल

या यादीतील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 या तारखेला जमा होणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article