Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: अस तपासा यादीत तुमच नाव, जाणून घ्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार की नाही?

4 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra 2024

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या नावाची यादी ऑनलाईन तपासता येणार आहे. आपण स्वतः यादीत आपले नाव आले आहे की नाही ते कसे तपासू शकता? जाणून घ्या…

Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न असणाऱ्या गटातील महिलांना आर्थिक मदत म्हणून सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. ज्यात महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे वर्षाला एकूण 18000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. सरकारने नवीन अर्थसंकल्पात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन Apply Link:

1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवरील “Apply Online” या लिंकवर क्लिक करा.

2. त्यानंतर पुढील नवीन पेजवर, ऑनलाइन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती नीट भरा.

3. फॉर्ममध्ये विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

4. सबमिट बटणवर क्लिक करून फॉर्म सबमिट करा. तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो जपून ठेवा. तुम्ही याच क्रमांकाच्या आधारे तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती तपासू शकता.

*Note – महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन लिंक लवकरच सक्रिय केली जाणार आहे. सध्या ‘नारीशक्ती’ मोबाईल अँप्लिकेशन वरून आपण लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थींची यादी ऑनलाईन तपासा:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केलेल्या आणी योजनेच्या लाभसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या नावाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी’ शासकीय योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या महिलांची नावे Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana List मध्ये आली असतील त्याच महिला पात्र असतील. आणी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये ऑगस्ट महिन्यात मिळतील. पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत आपले नाव कसे तपासायचे :

1. माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. “लाभार्थी यादी” (Majhi Ladki Bahin Beneficiary List) या लिंकवर क्लिक करा.

3. तुमचा जिल्हा, तहसील, गाव आणि प्रभाग निवडा व खाली दिलेल्या चेक लिस्ट (Check List) बटणावर क्लिक करा.

4. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यात तुमचे नाव आले आहे की नाही ते तपासा.

सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लिंक आणि ‘माझी लाडकी बहीण पाहिली लाभार्थी यादी’ प्रसिद्ध होताच आम्ही आपल्याला याबाबत अधिक माहिती देऊ. (पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध होताच, अधिकृत वेबसाईट लिंक आणी यादीत आपले नाव कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपवर शेयर केली जाईल, त्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा).

🔴 हे वाचल का? 👉 माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी कधी होणार जाहीर? जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List बद्दल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कधी येणार?

माझी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यापूर्वीच सरकारकडून अर्ज भरून झालेल्या पात्र महिलांची पहिली तात्पुरती यादी जाहीर करण्यात येईल. आणी त्यानुसार पहिल्या हफ्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजनांबद्दलच्या ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article