Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online Link Maharashtra Government: महाराष्ट्रात नव्याने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रूपये आर्थिक मदत करण्यात येत होती. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. वयोश्री योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra: Senior citizens above 65 years to receive ₹3000 financial assistance. Check eligibility, documents, and application process now!).
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना?
महाराष्ट्रातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा इत्यादीवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने राज्यातील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रूपये आर्थिक मदत देण्यात येते.
Mukhyamantri Vayoshri Yojana News: निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर पासून मुख्यमंत्री वयोश्री योजना पुनः सुरु होईल.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या खात्यात 2100 जमा होणार की नाही? ही नवीन यादी चेक करा Majhi Ladki Bahin Yojana New List Check Online.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड/ मतदान कार्ड
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता निकष?
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
- लाभार्थ्याने 31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावीत.
- लाभार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
- आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे.
- लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या खात्यात 2100 जमा होणार की नाही? ही नवीन यादी चेक करा Majhi Ladki Bahin Yojana New List Check Online.