PM Kisan Yojana 2024 : आज देशातील करोडो शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि कृषी विकासाला चालना देणे हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. (Can both husband and wife receive PM Kisan Yojana benefits in 2024? Learn eligibility details, and find out about the upcoming 19th installment of the PM Kisan scheme).
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक हप्त्याअंतर्गत दोन हजार रुपये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत योजनेचे एकूण 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत.
अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की एका कुटुंबातील शेतकरी असणारे पती-पत्नी दोघे मिळून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का? तुम्हालाही याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
एका कुटुंबातील, शेतकरी पती-पत्नी दोघेही एकत्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेसाठी पती-पत्नी दोघांनी मिळून अर्ज केल्यास त्यापैकी एकाचा अर्ज नाकारला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ज्या कुटुंबाच्या नावावर शेतजमिनीची नोंद आहे त्यांनाच मिळतो. या योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देशातील अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार फेब्रुवारी 2025 ला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करू शकते. मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.