PM-SYM Yojana Details in Marathi : महाराष्ट्र सरकारची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचताच सरकारी योजनांचा लाभ घेण्यात पिछाडीवर असणाऱ्या (Maharashtra) महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा एकच बोलबाला सुरु झाला आहे. अशातच, PM-SYM Yojana (पीएम-एसवाईएम योजना) या योजनेची देखील सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (PM-SYM Yojana offers a monthly pension of ₹3000 for unorganised workers. Learn about eligibility, benefits, and how to apply for this central government scheme in Maharashtra.).
केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय फायदेशीर सरकारी योजना आहे.
आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण खूप मेहनत करतो पण या महागाईच्या युगात आपण आपली सगळी स्वप्नं पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच सर्व लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा घेतात. यासाठी लोक पूर्वीपासूनच खूप आर्थिक नियोजनही करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या योजनेच्या मदतीने तुम्ही दरमहा फक्त ५५ ते २०० रुपये गुंतवून मोठी पेन्शन मिळवू शकता.
अतिशय फायदेशीर आहे PM-SYM योजना
केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. (या योजनेच्या लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या वारसास 50 टक्के पेन्शन मिळते).
पीएम श्रम योगी मानधन योजना पात्रता
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असणारी योजना आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे. ही योजना रिक्षाचालक, 4 चाकी वाहन चालक, भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, घरगुती कामगार, शेती कामगार, बांधकाम कामगार इत्यादींसाठी आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न रु 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ कसा घ्यायचा
पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची झेरॉक्स घेऊन तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे जाऊन नोंदणी करू शकता. तेथे बायोमेट्रिक्सद्वारे तुमची थेट नोंदणी केली जाईल. या केंद्रांद्वारे, तुमची सर्व माहिती भारत सरकारकडे ऑनलाइन जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी असणे आवश्यक आहे.
पीएम श्रम योगी मानधन योजनेबद्दल अधिक माहितीसाठी या टोल फ्री नंबरवर कॉल करा
पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी टोल फ्री क्रमांक १८००२६७६८८८ कार्यरत आहे. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळवू शकता.