मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी घरबसल्या असा करा अर्ज, लागतील फक्त 5 मिनिट PM Ujjwala Yojana 2024

2 Min Read
PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Apply

How To Register In PM Ujjwala Yojana 2024 | पीएम उज्ज्वला योजनेत नोंदणी कशी करावी: आजही देशातील अनेक महिला स्वयंपाकासाठी पारंपारिक संसाधनांचा वापर करतात. लाकूड आणी शेनासारख्या पारंपारिक संसाधनांचा वापर करून स्वयंपाक केल्याने खूप धूर निघतो. त्यामुळे महिलांना श्वसनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. देशाची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार देशातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देत आहे. तुम्हालाही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पिएम उज्वल्ला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेऊ शकता. (Learn how to apply for a free gas cylinder under the PM Ujjwala Yojana 2024. Get step-by-step guidance to complete your application in just 5 minutes from home).

PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Apply : पिएम उज्वल्ला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmuy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला Apply For New Ujjwala 2.0 Connection चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गॅस कंपन्यांचे सिलिंडर घेण्यासाठी पर्याय असतील. येथे तुम्हाला ज्या कंपनीचा सिलिंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या बॉक्सवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे आपल्याला आपले नाव, वितरकाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिन कोड इत्यादी विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल. आणी त्यानंतर शेवटी Apply बटणावर क्लिक करावे लागेल. 

अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी घरबसल्या सहजपणे अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article