PM Vishwakarma Yojana News: केंद्र सरकारने अलीकडेच एक नवीन योजना सुरु केली आहे जी देशातील पारंपारिक कारागीर आणि व्यवसायिकांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असे आहे. विश्वकर्मा योजनेंतर्गत येत्या 5 वर्षांत सुमारे 30 लाख कुटुंबांना लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने 13 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. (PM Vishwakarma Yojana: Benefiting 30 lakh traditional artisan families with Rs 13,000 crore in aid over 5 years. Get details on benefits, eligibility, and registration process).
विश्वकर्मा योजना अशा लोकांसाठी आहे जे पिढ्यानपिढ्या पारंपरिक काम/व्यवसाय करत आहेत. जसे सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, सोनारकाम, शिंपीकामइ. या लोकांकडे कौशल्य आहे, परंतु पैशांच्या टंचाईमुळे ते आपला व्यवसाय वाढवू शकत नाहीत. त्यामुळे या योजनेतून त्यांना प्रशिक्षण, टूल किट आणि कमी दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही भारत सकारद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे जिचा उद्देश देशातील पारंपारिक कारागीर आणि व्यवसायीकांना व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्साहन देने हा आहे. या योजनेंतर्गत कारागीरांना नवीन पद्धतीने काम करायला शिकवले जाते, त्यांना नवीन साधने दिली जातात आणि त्यांना कमी व्याजदरावर कर्जही दिले जाईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीरांना अनेक फायदे मिळतात
- मोफत प्रशिक्षण : या योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असते.
- दैनिक भत्ता: प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक कारागिराला 500 रुपये दैनिक भत्ता दिला जातो.
- टूल किट: प्रशिक्षणानंतर, प्रत्येक कारागिराला 15,000 रुपयांपर्यंतचे टूल किट दिले जाते.
- अत्यल्पदरात कर्ज: या योजनेंतर्गत कारागिरांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 5% व्याजाने दिले जाते.
- डिजिटल पेमेंट बोनस: कारागिरांनी डिजिटल पेमेंट केल्यास, त्यांना प्रत्येक व्यवहारावर 1 रुपये बोनस मिळेल.
- विपणन समर्थन: सरकार कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी देखील मदत करते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
- अर्जदार 18 पारंपारिक व्यवसायांपैकी कोणत्याही एका व्यवसायात काम करत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला त्याच्या कामाचा पुरावा द्यावा लागेल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये खालील 18 व्यवसाय समाविष्ट आहेत:
- सुतार
- बोट बांधणारे
- लोहार
- लॉकस्मिथ
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार
- चांबार
- गवंडी
- बास्केट/चटई उत्पादक
- बाहुली आणि खेळणी उत्पादक
- न्हावी
- हार बनवणारे
- धोबी
- शिंपी
- मासेमारीची जाळी बनवणारे
- हातोडा आणि टूल किट निर्माते
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
- तिथे ‘Registration’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.
- OTP टाकून पडताळणी करा.
- तुमची माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा.
तसेच, तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन देखील अर्ज करू शकता.