Majhi Ladki Bahin Yojana Latest News : 1 जुलै पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात करण्यात आली. त्यानुसार सरकारकडून प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 1 जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्यात आले.
आत्तापर्यंत राज्यातील जवळपास दीड कोटिहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळतील अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. पण, महिलांना मिळणारी रक्कम कमी मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले आहेत.
मात्र, 31 ऑगस्टनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे. जुलै, ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
म्हणजेच 1 सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नसून फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयेच मिळतील. व तिथून पुढे प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील.