Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्राचे ऐतिहासिक बजेट, ‘माझी लाडकी बहिन योजने’साठी ₹46,000 कोटींची तरतूद

2 Min Read
Maharashtra Tops National Budget For Womens Cash Transfer Schemes Like Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुंबई: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News – महाराष्ट्राने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महिलांसाठी कॅश ट्रान्सफर योजनांमध्ये देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक बजेट ठेवले आहे. ‘मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजने’साठी ₹46,000 कोटी ची ऐतिहासिक तरतूद करण्यात आली आहे, असे PRS लेजिस्लेटिव्ह (PRS Legislative) च्या “State of State Finances” अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra allocates ₹46,000 crores for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, making it the highest budget for women’s cash transfer schemes in India. Learn more about this significant development).

महाराष्ट्राची मोठी कामगिरी

PRS लेजिस्लेटिव्ह (PRS Legislative) च्या वार्षिक अहवालानुसार, महाराष्ट्राने महिला सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, राज्याने महिलांना आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांसाठी सर्वाधिक निधी ठेवला आहे. या वर्षी आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांसाठी ₹1 लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम 9 राज्यांनी बजेट केली आहे, ज्यात महाराष्ट्राचा वाटा ₹46,000 कोटी आहे.

अन्य राज्यांशी तुलना

महाराष्ट्राच्या ‘मुख्यमंत्रि माझी लाडकी बहिन योजने’अंतर्गत महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात. मात्र, कर्नाटकमधील ‘गृहलक्ष्मी योजना’ जरी ₹2,000 देत असली तरी त्या योजनेच बजेट ₹28,608 कोटी आहे, जे महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्राने ₹46,000 कोटी ची तरतूद करून देशातील इतर सर्व राज्यांना मागे टाकले आहे.

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवण्याचे आश्वासन

महायुती सरकारने राज्य विधानसभा निवडणुकीत ‘माझी लाडकी बहिन योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा ₹2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि नजीकच्या काळात महिलांना ₹2,100 चा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांत कॅश ट्रान्सफर योजनांची सुरुवात

महाराष्ट्रासोबतच, झारखंड आणि हिमाचल प्रदेशने या योजनांचा विस्तार सुरू केला आहे. तसेच, पंजाब, हरियाणा, आणि तेलंगणा राज्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी कॅश ट्रान्सफर योजनांच्या घोषणा केल्या आहेत.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now