Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले गेले आहेत, पण सध्या सुरू असलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमुळे अनेक महिला चिंतेत आहेत. अर्जांची छाननी प्रक्रिया काटेकोरपणे केली जात असल्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज बाद होण्याची शक्यता आहे, आणि यामुळे अर्ज भरलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Concerns rise over application reviews in Ladki Bahin Yojana. Government assures valid applicants will continue receiving benefits; women to get pending payments soon).
नेमकी काय आहे समस्या?
- राज्यभरात लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत, पण छाननी प्रक्रियेमुळे अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
- महिलांना प्रश्न पडला आहे की, “आपला अर्ज बाद होणार का? आता पुहढचा हफ्ता मिळणार की नाही?”
- पात्र असूनही काही महिलांच्या खात्यात जुलै पासूनची रक्कम जमा झालेली नाही.
समोर येत असलेल्या महापालिकांच्या आकडेवारीनुसार काही क्षेत्रांत अर्ज मोठ्या प्रमाणावर बाद झाले आहेत. यामुळे अर्ज पात्र असलेल्या महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
सरकारचं दिलासा देणारं पाऊल
महायुती सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्यांचे अर्ज वैध आहेत, त्यांना कोणताही त्रास होणार नाही. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महिलांना दिलासा देत सांगितले की, “चुकीच्या दस्तऐवजांमुळे अर्ज बाद होऊ शकतो, पण वैध अर्जदारांवर अन्याय होणार नाही.” ज्यांना खरच गरज आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ही प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे तुम्ही अर्जात दिलेली सर्व माहिती खरी असेल तर अशा महिलांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
हफ्ता कधी जमा होईल?
- आतापर्यंत महिलांना पाच हफ्त्यांचे पैसे मिळाले आहेत.
- सहाव्या हफ्त्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित पैसे दिले जातील, अशी खात्रीलायक माहिती आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक फायदा झाला आहे. सरकारची तपासणी प्रक्रिया ही फक्त मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता संयम राखावा.
🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana: डिसेंबरचा हफ्ता जमा न झाल्यास येथे नोंदवा तक्रार.
महिला वर्गाला सल्ला
जर तुमचा अर्ज वैध असेल आणि तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे दिली असतील, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर हफ्ता तुमच्या खात्यावर जमा केला जाईल.
मराठी सरकारी योजना संपादकीय टीप: सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे यश मोठे आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया ही योजनेंतर्गत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवावा आणि या प्रक्रियेचा एक भाग म्हणून संयमाने वाट पहावी. 🌹
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजना दरमहा ₹2,100 वाढीबाबत सीएम फडणवीस यांची महत्वाची घोषणा.