Aadhaar Card Free Update Deadline 14 December 2024: आधार कार्ड हा आपल्या महत्वाच्या दस्तावेजांपैकी एक आहे, जो सरकारी व खासगी क्षेत्रातील अनेक कामांसाठी अनिवार्य मानला जातो. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल, तर UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने दिलेल्या सूचनेनुसार 14 डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करा. 14 डिसेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे ही संधी वाया जाऊ देऊ नका. (Update your Aadhaar card for free online before December 14, 2024. Follow the UIDAI guidelines to update address and photo ID documents easily. Don’t miss the deadline).
आधार कार्ड मोफत अपडेट कसे करावे?
स्टेप 1:
- आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- येथे लॉगिन करण्यासाठी 12 अंकी आधार क्रमांक भरा.
- कॅप्चा कोड टाका आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- लॉगिन केल्यावर डॅशबोर्ड उघडेल.
स्टेप 2:
- डॅशबोर्डवर ‘अपडेट आधार कार्ड’ पर्याय निवडा.
- येथे तुम्हाला दोन दस्तऐवज अपलोड करावे लागतील: एक फोटो ओळखपत्र आणि एक पत्त्याचा पुरावा.
- अपलोड केलेले दस्तऐवज विभागाकडून पडताळले जातील.
स्टेप 3:
- फोटो आयडी व पत्ता पुरावा म्हणून उपलब्ध पर्यायांमधून योग्य दस्तऐवज निवडा.
- दस्तऐवजाचा साइज 2 MB पेक्षा जास्त नसावा, याची काळजी घ्या.
- दस्तऐवज पडताळणीनंतर काही दिवसांत आधार अपडेट पूर्ण होईल.
आधार अपडेट का आवश्यक आहे?
सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, बँक खाते सुरू करायचे असेल किंवा डिजिटल व्यवहार करायचे असतील, तर तुमचे आधार अपडेट असणे गरजेचे आहे.
अंतिम संधी गमावू नका
UIDAI ने आधीच सूचित केले आहे की 14 डिसेंबर 2024 नंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे वेळेतच ही मोफत सेवा वापरून तुमचा आधार अपडेट करा.