आयुष्मान भारत योजनेचे फायदे माहित आहेत का? ‘यामुळेच’ सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत Ayushman Card Benefits

2 Min Read
Ayushman Bharat Yojana Benefits In Marathi News

Ayushman Bharat Yojana Benefits in Marathi : आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी एक खूपच फायदेशीर योजना आहे. जेव्हा सरकार एखादी नवीन योजना सुरू करते तेव्हा सरकारकडून त्या विशिष्ठ योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवले जातात, जेणेकरून ज्यांच्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे फक्त त्याच पात्र लोकांना त्या योजनेचा लाभ मिळावा. 

आपल्या देशात सध्या अनेक प्रकारच्या योजना सुरु आहेत, त्यापैकी काही आर्थिक लाभ देतात तर काही अनुदान किंवा इतर प्रकारची मदत देतात. यतीलच एक फायदेशीर सरकारी योजना (Sarkari Yojana) म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेंतर्गत मोफत उपचाराचा लाभ मिळत असून, आपल्या देशात सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या योजनेत सहभागी होऊन मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, तर आधी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांबद्दल जाणून घ्या. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घ्या…

आयुष्मान भारत योजनेचे फायदे काय आहेत?

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सरकारद्वारे पात्र लाभार्थ्यांचे (Ayushman Card) आयुष्मान कार्ड बनवले जाते. त्यानंतर या कार्डच्या मदतीने कार्डधारक या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात. विशेष म्हणजे, “आयुष्मान कार्डद्वारे तुम्ही दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता”.

आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

तुम्ही जर आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल,

  • 1: अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटा आणि त्यांना सांगा की तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवायचे आहे.
  • 2: यानंतर तुमची पात्रता तपासली जाते आणि जर तुम्ही पात्र असाल तर पुढील प्रक्रिया सुरू होते.
  • 3: जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली जाते ज्यात आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि एक सक्रिय मोबाईल नंबर इ. असेल.
  • 4: तुमची कागदपत्रे त्यांना दिल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
  • 5: आणी तुमचा अर्ज स्वीकारला जातो, त्यानंतर काही काळाने तुमचे आयुष्मान कार्ड तयार केले जाते. मग त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणी मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now