तर 100 दिवसांत सुरु होईल महालक्ष्मी योजना, प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 3000 रुपये Mahalaxmi Yojana Maharashtra News

2 Min Read
Mahalaxmi Yojana Maharashtra 2024 News

Mahalaxmi Yojana Maharashtra : महाविकास आघाडीने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या काही महत्वकांक्षी योजनापैकी एक योजना म्हणजे महालक्ष्मी योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा केले जाणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे. (Mahalaxmi Yojana: MVA promises to launch the Mahalaxmi scheme within 100 days, offering Rs. 3000 monthly to Maharashtra women’s bank accounts and free bus travel for women).

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या घोषणा केल्या जात आहे. महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Majhi Ladki Bahin Yojana) मिळालेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना (Mahalakshmi Yojana) सुरु करून या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा केले जातील असे आश्वासन दिले आहे.

100 दिवसांत सुरु करणार महालक्ष्मी योजना

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यानुसर, महालक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार असून, महिलांना बस प्रवास पूर्णपणे मोफत देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या अजेंडात महालक्ष्मी योजनेचा समावेश आहे. म्हणजेच जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल तर सरकार स्थापन झाल्यापासून 100 दिवसांच्या आत महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरु होईल व महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा केले जातील.

🔴 हेही वाचा 👉 नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना? या योजनेची का होतेय सर्वत्र ईतकी चर्चा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now