Majhi Ladki Bahin Yojana 2025 Applications Not Rejected Aditi Tatkare: महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहिण योजना योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले की या योजनेअंतर्गत कोणाचाही अर्ज थेट फेटाळला जाणार नाही. मात्र, अर्जदारांनी योजनेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. (Majhi Ladki Bahin Yojana 2025: Applications will not be rejected outright, but adherence to eligibility criteria is mandatory, says Aditi Tatkare. Learn more about the transparent process and required documents).
अर्ज प्रक्रियेत येणार पारदर्शकता
मंत्री तटकरे म्हणाल्या की, “या योजनेसाठी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. मात्र, त्यावर सरकारने उपाययोजना केल्या आहेत. अर्जदार महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.” तसेच येत्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाईल.
अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया पारदर्शक
अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असेल. अर्ज फेटाळण्यापूर्वी अर्जदार महिलांना अपूर्ण कागदपत्रे भरून देण्यासाठी संधी दिली जाईल. तसेच, अर्ज फेटाळण्याचे कारण सांगून आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले जातील.
माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या आर्थिक स्थैर्य आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात आली आहे. यामध्ये पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत, तीन मोफत गॅस सिलेंडर तसेच काही नवीन अतिरिक्त सुविधा पुरवल्या जातील अस अदिती तटकरे म्हणाल्या.
आवश्यक कागदपत्रांची यादी
योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल:
- आधार कार्ड
- बँक खात्याचा तपशील
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र
महिला व बालविकास विभागाने आवाहन केले आहे की अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका. चुकीच्या माहितीसाठी अर्ज फेटाळला जाऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देणे आणि समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करणे, हे या योजनेचे (Mazi Ladki Bahin Yojana) मुख्य उद्दिष्ट आहे.