…तरच मिळतील लाडक्या बहिणींना 2100 रुपये’; अस का म्हणाले अमित शाह? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Amit Shah Statement 2100 Rupees

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सध्या देण्यात येत असलेला 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आल आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लाडकी बहीण योजनेबाबत बोलले. (Amit Shah assures an increase in the Majhi Ladki Bahin Yojana amount to Rs 2100 if Mahayuti government is re-elected, amidst opposition’s Mahalakshmi Yojana proposal).

महायुती सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आश्वासनं दिली जात आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असेली 1500 रुपयांच्या हफ्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती कडून देण्यात आल असतानाच (काँग्रेस) महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा (Mahalaxmi Yojana Maharashtra) केली असून महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 3000 रूपये देण्याच जाहीर केल आहे.

दरम्यान, रविवारी रावेर आणि मलकापूर येथे अमित शाह यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान बोलताना अमित शाहांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले ‘जर मविआ सत्तेत आली, तर लाडकी बहीण योजना बंद करतील’. पण तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्रात महायुतीच सरकार स्थापन होणार आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्या देण्यात येत असलेली 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये केले जातील.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी सरकारचा ४६ हजार कोटींचा ठोस निधी, व्यवसायातून अनेक महिलांची प्रगती.

1 जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून महाराष्ट्रातील ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून कमी आहे. त्यांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. महाराष्ट्रात पुनः जर महायुती सत्तेत आली, तर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये केले जातील. अस आश्वासन महायुतीकडून देण्यात आल आहे.

🔴 हेही वाचा 👉 नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना? या योजनेची का होतेय सर्वत्र ईतकी चर्चा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now