Majhi Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update: राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana: Devendra Fadnavis announces that the December installment of ₹1500 will be credited soon. Find out updates on the scheme and its future plans).

डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यात

Cm Devendra Fadnavis: नागपूर येथे चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये पाठवले जातील. कोणतीही योजना बंद होणार नाही आणि महिलांनी कोणत्याही शंकेला स्थान देऊ नये.”

2100 रुपये मिळणार का?

महायुती सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या महिलांना दरमहा 1500 रुपयेच मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेत सुधारणा केली जाण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ३००० रुपये एकत्र जमा होणार.

योजनेचा दुरुपयोग होऊ नये

फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, “काही जणांनी अनेक खाती उघडून योजनेचा गैरफायदा घेतला आहे. अशा प्रकारामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतो. या योजना योग्य मार्गाने लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”

आतापर्यंत 5 हप्त्यांचे वाटप

या योजनेद्वारे महिलांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत. डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता लवकरच जमा होईल. महिलांना या योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे सरकारचे मत आहे.

महिलांसाठी आश्वासक पाऊल

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना भविष्यात अधिक सुधारित स्वरूपात लागू केली जाईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now