Majhi Ladki Bahin Yojana Latest Update: लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हफ्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या महिन्याचा कमीत-कमी 13 लाख नव्या महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. (Majhi Ladki Bahin Yojana latest update: 13 lakh new women beneficiaries to receive ₹2100 monthly aid. December 2024 payments to be credited to Aadhaar-linked bank accounts soon).
Mazi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 13 लाख नव्या महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यास आधार सीडिंगची आवश्यकता होती आणि ज्या महिलांचे अर्ज प्रलंबीत होते, अशा महिलांचा 2.34 कोटी लाभार्थी महिलांमध्ये समावेश केला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला इतक प्रचंड बहुमत मिळाल्याच बोलल जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली होती व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या देण्यात येत असलेला 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्याचे महायुतीने आश्वासन दिले होते.
महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल नव्हत. त्यानंतर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता महायुती सरकार स्थापन होताच नव्या सरकारला फक्त लाडकी बहीण योजना सुरू ठेवावी लागणार नसून या योजनेच्या माध्यमातून दरमहा 2100 रुपये देण्याच वचनही पूर्ण कराव लागणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana December Payment Update: महिला आणि बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेसाठीचे 13 लाख अर्ज प्रलंबित होते ते लवकरच मार्गी लावले जातील आणि पात्र महिलांच्या खात्यात या महिन्याच्या अखेरीस डिसेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. प्रलंबित 13 लाख अर्जाची छाननी करून त्यातील पात्र महिलांना 2.34 कोटी लाभार्थ्यांच्या यादीत जोडले जाईल. व त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा केली जाईल.
🔴 हेही वाचा 👉 एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसंदर्भात मोठी घोषणा – पात्र महिलांना दरमहा 2100.