लाडक्या बहिणींना केंद्रीय मंत्र्यांनी दिली खूशखबर, लाडक्या बहिनींच्या खात्यात जमा होणार ₹2,100 Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today: महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम 2100 रुपये करण्यात येणार आहे. आणी निवडणुकीनंतर लगेचच पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही मोठी घोषणा केली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Update: Central Minister announces ₹2,100 installment for women beneficiaries under Maharashtra’s popular scheme, to be deposited after election results).

Mazi Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी ‘माझी लाडकी बहीण योजने’बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली की, महाराष्ट्रात ‘महायुती’ सरकार स्थापन होताच ‘माझी लाडकी बहीण योजने’चा हप्ता 2100 रुपये करण्यात येईल. व निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच पात्र महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये जमा करण्यात येतील.

माझी लाडकी बहीण या योजनेत सध्या 2.34 कोटी महिला लाभार्थी आहेत, ज्यांना जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे हफ्ते मिळाले आहेत. गोयल म्हणाले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यभरातील महिलांना प्रत्येकी ₹1,500 चे पाच हप्ते मिळाले आहेत. आणी आता ईथुन पुढे 2100 रुपये हफ्ता जमा होईल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now