Ladki Bahin Yojana: आता लाभ मिळण्यासाठी ‘इतक्या’ वर्षांचा महाराष्ट्रातील रहिवास आवश्यक

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Residency Rules Benefits

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Residency Rules Benefits: महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी एक महत्त्वाची कल्याणकारी योजना ठरली आहे. या योजनेतून सध्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदतीसोबतच अनेक सवलतीही दिल्या जातात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी राज्य सरकारच्या पात्रता निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे. (Know the eligibility rules for Majhi Ladki Bahin Yojana in Maharashtra. Women with 15 years of residency are eligible for monthly financial aid. Learn how to apply and benefit today).

लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष

  • महिलेचे वय: 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे .  
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न: 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे .  
  • महाराष्ट्रातील रहिवासी: महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं अत्यावश्यक आहे.  
  • परराज्यात जन्मलेल्या पण महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या पुरुषाशी विवाह केलेल्या महिलांना देखील योजनेचा लाभ घेता येतो.  

रहिवास निकष?

‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी महिलांनी महाराष्ट्रात किमान 15 वर्ष राहिलेलं असणं आवश्यक आहे. यासाठी महिलांकडे आधिवास प्रमाणपत्र किंवा किमान 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे.  

डिसेंबर-जानेवारीचे पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या लाभधारक महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

🔴 हेही वाचा 👉 पुढचा हप्ता कधी येणार? पात्रतेसंदर्भात मोठा निर्णय!.

लवकरच योजनेच्या रकमेची वाढ?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांसाठी या योजनेच्या रक्कम वाढीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत रकमेची वाढ कधी जाहीर होईल, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागून आहे.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

नवीन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्र, ग्रामपंचायत किंवा आंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड  
  2. पत्त्याचा पुरावा  
  3. बँक खाते पासबुक 
  4. आधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड  

राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत आहे. परंतु, या योजनेचा मिळण्यासाठी पात्रतेची पूर्तता करणं गरजेचं आहे. ज्या महिला या निकषांमध्ये पात्र असतील, फक्त त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now