Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : अर्ज पात्र असून बँक खात्याशी आधार लिंक करून देखील अजून पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना अर्ज भरण्याची अजून एक संधी देण्यात येणार. (Majhi Ladki Bahin Yojana update: Maharashtra government extends application deadline till Sept 30, 2024, for women with Aadhaar-linked bank accounts still awaiting payments).
माझी लाडकी बहिन योजनेचा राज्यातील प्रत्येक पात्र महिलांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारने अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो महिलांना होणार आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra: लाडकी बहिन योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने’अंतर्गत गेल्या दोन महिन्यांत राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पण अर्ज पात्र ठरून देखील अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
अजून खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे कारण म्हणजे या महिलांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेला नाही, अशा पात्र महिलांची संख्या सुमारे 40 ते 42 लाख ईतकी आहे. आधार आणि बँक खाते लिंक केल्यानंतर त्यांनाही इतर महिलांसोबत लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करून देखील त्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना. अर्ज भरण्याची अजून एक संधी देण्यात येणार आहे. आणी या महिन्यात त्यांच्याही बँक खात्यात पैसे जमा होतील.
माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचा अंदाज यावरून लावता येतो की, आतापर्यंत महाराष्ट्रातून 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत आणी अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून सुरूच आहे.