मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रिया आणी निवड झालेल्या योजनादूतांनी करावयाची कामे? Mukhyamantri Yojana Doot Result Process

2 Min Read
Mukhyamantri Yojana Doot Selection Process 2024

Mukhyamantri Yojana Doot Update Today : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमास राज्यातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. योजनादूत उपक्रमासाठी आतापर्यंत 1 लाख 75 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेले उमेदवार आता (Yojana Doot Result) योजनादूत अंतिम निवडीची प्रतीक्षा करत आहेत. (Learn about the selection process for the Mukhyamantri Yojana Doot in Maharashtra and the responsibilities of selected candidates, including scheme promotion and public awareness tasks. Over 50,000 candidates to be selected for this government initiative).

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

योजनादूत उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या योजनादूतांना दरमहा 10000 रूपये मानधन दिले जाणार आहे. तुम्हीही जर (Yojana Doot Bharti 2024) योजना दूत भर्ती साठी अर्ज केला असेल तर योजनादूत निवड प्रक्रिया कशी आहे आणी निवड झालेल्या योजनादूतांना नेमकं काय काम करावं लागेल त्याबादल तुम्हाला माहिती असणं गरजेच आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात…

कशी आहे योजनादूत निवड प्रक्रिया?

  • 1: योजनादूत भर्ती साठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नेमण्यात आलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण केली जाईल.
  • 2: ऑनलाईनरीत्या प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी (Yojana Doot List) जाहीर केली जाईल.
  • 3: यानंतर पात्र उमेदवारांच्या यादीत नाव आलेल्या संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल (जसे की, उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे).
  • 4: त्यानंतर पात्र उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल.

योजनादूत म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना नेमकं काय काम करावं लागेल?

  • 1: योजनादूत म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी योजनांची माहिती व प्रशिक्षन देतील.
  • 2: त्यानंतर प्रशिक्षित योजनादूतांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन योजनांविषयीची माहिती नागरिकांना देऊन सरकारी योजनांबद्दल समाजात जागृकता निर्माण करण्याचे काम करावे लागेल.
  • 3: राज्य शासनाच्या विविध योजनांच प्रचार आणि प्रसिद्धी करताना योजनादूतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा लागेल.
  • 4: रोजच्या कामाचा (देण्यात येणाऱ्या नमुन्याप्रमाणे) अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करावा लागेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article