PM Kisan Yojana News : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 6000 रुपयांची ही आर्थिक मदत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते. प्रत्येक हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेच्या एकूण 17 हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती 18 व्या हफ्त्याची.
अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की पती-पत्नी दोघे मिळून पीएम किसान योजनेसाठी अर्ज करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
तुम्हाला हे माहित असल पाहिजे की, पीएम किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती घेऊ शकते. पती-पत्नी दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
मिळालेल्या माहुतीनुसार, केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जारी करू शकते. पण, सरकारने अद्याप पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.