मुंबई : महाराष्ट्राती नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसह अन्य अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती होती. (Maharashtra’s DCM Eknath Shinde was questioned by women about the ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’ after the oath ceremony. Women ask for clarification on the promised ₹2100).
याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांना महिलांच्या एका गटाने लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न विचारला. शपथविधीनंतर लगेचच, महिलांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत प्रश्न विचारला. महिलांनी एकनाथ शिंदे यांना विचारले, “लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता कधी दिला जाणार आहे? १५०० रुपये दिले जातील की २१०० रुपये दिले जाणार आहेत?
देण्याची घोषणा करण्यात आली होती, एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत आश्वासन दिले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ
महायुतीच्या प्रचारादरम्यान, १५०० रुपयांचा हफ्ता वाढवून महिलांना महिन्याला २१०० रुपये शिंदे यांनी महिलांना प्रत्युत्तर दिले आणि हसत म्हणाले, “सर्व काही होईल, वेळेवर सर्वकाही मिळेल.”
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून महिलांना दरमहा ₹१५०० मिळत असून, या रकमेत वाढ करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा पाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी संबंधित प्रशासन कार्यरत आहे.