2000 Rupees Note Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटांबाबत एक महत्वाचे अपडेट दिले आहे. (2000 Rupees Note Update: 98.08% of ₹2000 notes have returned to banks, says RBI. Read the latest updates on deposits, exchange facilities, and more).
RBI कडून 19 मे 2023 रोजी या नोटा चलनातून हटविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. मात्र, 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत 98.08% नोटा म्हणजेच 3.49 लाख कोटी रुपये बँकांमध्ये परत आल्या आहेत.
2000 Rs Note News In Marathi: अजूनही 6,839 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत या नोटा सर्व बँक शाखांमधून जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. आता ही सेवा रिझर्व्ह बँकेच्या 19 निर्गम कार्यालयांतून सुरू आहे.
2000 रुपयांच्या नोटा बदलाची/जमा करण्याची सोय:
- RBI चे निर्गम कार्यालय: अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता यांसह 19 शहरांमध्ये ही सुविधा आहे.
- भारतीय पोस्टद्वारे नोटा पाठवून देखील बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
2000 रुपयांच्या नोटा बंद जमा करण्याची सुविधा मर्यादित कालावधीपर्यंतच सुरू राहणार आहे.