5000 Rs New Note RBI News Marathi: सोशल मीडियावर पाच हजार रुपयांच्या नव्या नोटेबाबत चर्चा रंगली आहे. आरबीआयने यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. (RBI has clarified that there are no plans to issue a 5000 rupee note. Read the truth behind the viral news and learn about the history of high denomination notes in India. Stay informed with the latest updates).
5000 New Note RBI Clarification: सध्या सोशल मीडियावर पाच हजार रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात येणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. या चर्चांमुळे अनेक व्यापारी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) या अफवेवर स्पष्टता देत ही बातमी फेटाळली आहे.
पाच हजाराच्या नोटेचा इतिहास
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1954 साली पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, 1978 साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या होत्या.
सध्याच्या चलनातील सर्वात मोठी नोट
सध्या भारतात सर्वात मोठ्या मूल्याची नोट 500 रुपयांची आहे. त्याशिवाय 200, 100, 50, 20, आणि 10 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
आरबीआयचा खुलासा
सोशल मीडियावरील या फेक बातमीबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, (5000 Rs New Note) पाच हजार रुपयांची नवी नोट जारी करण्याचा कोणताही विचार किंवा तशी भविष्यकालीन कोणतीही योजना अखलेली नाही.” तसेच, देशातील सध्याची चलन प्रणाली ही आर्थिक गरजांसाठी पुरेशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
फेक न्यूजपासून रहा सावध
आरबीआयने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही माहितीची पुष्टी केल्याशिवाय ती शेअर करू नका.
पाच हजार रुपयांच्या नव्या नोटेबाबतची बातमी पूर्णतः अफवा असून आरबीआयने अशा कोणत्याही योजनेचा इन्कार केला आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या.
🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहीण’ योजनेवरून प्रणिती शिंदे आणि अदिती तटकरे भिडल्या!.