Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पुढील हप्ता: महाराष्ट्रातील महिला आता माझी लाडकी बहिन योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकार पुढील हप्ता कोणत्या दिवशी जारी करू शकते ते जाणून घेऊयात… (The next installment of Majhi Ladki Bahin Yojana is expected to be released soon! Eligible women may receive ₹2100 in their accounts by the first week of December. Check the latest updates now!).
Majhi Ladki Bahin Yojana Next Installment: महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुती आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत.
राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार स्थापन होताच लाडक्या बहिनींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याची रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच योजनेचा 6 वा हप्ताही लवकरच जारी केला जाऊ शकतो.
महाराष्ट्रात जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात होते. आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत सरकारकडून या योजनेचे 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकतो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेचच माझी लाडकी बहिन योजनेचा पुढचा हप्ता जारी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रात 2 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाऊ शकतो.