Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महायुतीच्या सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ लागू करून महिलांना दरमहा ₹1500 देण्यास सुरुवात केली होती, आणी निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा ₹2100 देण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. परंतु, पण हे ₹2100 यापूर्वीचा हफ्ता जमा झालेल्या महिलांना सहजासहजी मिळणार नाहीत. त्यासाठी आता सरकारकडून काही निकषांची पडताळणी केली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होतील. (The Maharashtra government’s Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana offers ₹2100 per month to women, with a detailed eligibility check. Find out what criteria will be checked before the payments are made).
Ladki Bahin Yojana New Update Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दिले जाणारे ₹1500 दरमहा थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. सरकारने या योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती ज्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तथापि, सरकारने जाहीर केले आहे की, यापुढे महिलांना ₹2100 प्रति महिना दिले जातील, पण त्यासाठी काही अटींनुसार पडताळणी केली जाईल.
पडताळणीतील प्रमुख निकष: (Majhi Ladki Bahin Yojana 2100 Eligibility Check)
- पती आयकर भरतो का?
– लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलेचा पती आयकर भरतो का हे तपासले जाईल.
- कुटुंबात चारचाकी वाहन आहे का?
– जर कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर अशा कुटुंबातील महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- दोन महिलांनी अर्ज केला आहे का?
– एकाच कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज केला असल्यास, त्यांची पात्रता तपासली जाईल.
- या योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या सरकारी योजनेतून लाभ मिळत आहे का?
– या योजनेव्यतिरिक्त ईतर योजनेतून दरमहा 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असलेल्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 नेमकी कशी असेल लाडकी बहीण योजना लाभार्थी पडताळणी प्रक्रिया? आणि पडताळणीचे फायदे.