Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today 1 December 2024: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जात होती. महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपयांचा लाभ देण्याचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, या योजनेबाबत एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. (Ajit Pawar clarifies that there will be no changes in the criteria for the Ladki Bahin Yojana. Women will continue to receive financial assistance as announced. Find out more about the scheme and its benefits).
महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पण राज्यात नव्हे सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारकडून महिलांना ₹1500 ऐवजी ₹2100 प्रति महिना देण्यात येणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचे पूर्वीचे सर्व निकष बदलणार का? आता सरकारकडून नवीन पात्रता अटी घातल्या जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू, अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई.
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचा खुलासा
या संभ्रमावर अजित दादा पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याचा कोणताही विचार नाही. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ.” यावरून असे सिद्ध होते की योजनेचे निकष सध्यातरी बदलणार नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना ₹1500 देण्यात येत होते आगामी काळात ₹2100 देण्यात येणार आहेत. यासाठी सध्या कोणतेही निकष बदलले गेले नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले. महिलांसाठी या योजनेचा लाभ कायम ठेवला जाईल, अशी आश्वासक माहिती अजित दादांनी दिली आहे. पण सरकारकडून 2100 रुपये देण्यापूर्वी पडताळणी करण्यात येणार आहे. व फक्त खऱ्या पात्र लाभार्थी महिलांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 सरकारने जाहीर केले 2100 रुपये, पण लाडक्या बहिणींना जावे लागणार या पडताळणी प्रक्रियेतून.