महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता कधी जमा होईल, याकडे महिलांचे लक्ष आहे. आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांमध्ये एकूण ₹7500 जमा करण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार एप्रिल ते जुलै दरम्यान रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख मुद्दे:
- जुलै 2024 पासून सुरू झालेली लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक लाभ देते या योजनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
- महायुतीने आचारसंहिता कालावधीत योजनेचा लाभ थांबवून निवडणुकीनंतर दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
- डिसेंबरच्या हप्त्यासाठी ₹1500 कि वाढीव ₹2100 यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
सहाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही कडक निकष लागू करण्यात आले आहेत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा ज्या महिला अथवा महिलेच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून, नवीन अर्ज करणाऱ्या महिलांनी आता योजनेच्या अटी आणि पात्रतेची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.
ताज्या अपडेटसाठी ‘मराठी सरकारी योजना’ला भेट द्या!
🔴 हेही वाचा 👉 या महिलांचे अर्ज बाद, सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा.