या २ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता न मिळाल्याने नाराजी Majhi Ladki Bahin Yojana Dharashiv Women Did Not Receive November Payment

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana November Payment Update Dharashiv | X/@AjitPawarSpeaks

Majhi Ladki Bahin Yojana Dharashiv : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचे हफ्ते देण्यात आले असले तरी अजूनही काही महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळाला नाही. (Dharashiv News: Under Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, 2 lakh women in Dharashiv district did not receive their November payment. Read the latest updates on the scheme, government actions, and women’s demands for immediate disbursal).

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. यातील १ लाख ७६ हजार महिलांना सलग पाच हप्त्यांची रक्कम मिळाली असली, तरी उर्वरित दोन लाख महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच नाही. 

महिलांकडून रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत हप्ते मिळाले आहेत. मात्र, नोव्हेंबरच्या हप्त्यापासून अनेक महिला वंचित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील महिलांकडून नोव्हेंबरच्या हफ्त्याची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली जात आहे. 

अर्जांची पुनर्तपासणी आणि पुढील प्रक्रिया 

महायुती सरकारने योजनेच्या अटी आणि पात्रता तपासण्यासाठी अर्जांची पुनर्तपासणी सुरू केली आहे. 2 कोटिहून अधिक अर्जांची पुनर्तपासणी करायची असल्याने रक्कम विलंब होत असल्याचे समोर आले आहे.  

सरकारने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र,, सद्यस्थीतत उर्वरित हप्त्यांचा विलंब महिलांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now