Aadhar Card Update Status Check Online Maharashtra: जर तुम्ही तुमच आधार कार्ड अपडेट केल असेल, तर ते वेळेत करण गरजेच आहे कारण 14 डिसेंबर 2024 नंतर आधार कार्ड अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. त्यासाठी तुमच आधार अपडेट आहे कि नाही त्याची स्थिती तपासण गरजेच आहे. (Check Aadhaar update status before 14th December 2024 to avoid future issues. Follow UIDAI’s official steps for verification. Don’t delay; act now).
आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी ओळखपत्र म्हणून अतिशय महत्त्वाचे आहे. सिम कार्ड खरेदी, बँकेत खाते उघडणे, केवायसी करणे यासारख्या अनेक सेवांसाठी आधार आवश्यक आहे. तसेच, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेळोवेळी आधार अपडेट करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना देत असते.
आधार अपडेट स्थिती तपासण का महत्वाचे आहे?
UIDAI ने 10 वर्षांपूर्वी जारी केलेल्या आधार कार्ड धारकांना त्यांचे कार्ड तातडीने अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही तुमचे आधार अपडेट केले असेल, तर त्याची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. आधार अपडेट न केल्यास आधारशी संबंधित अनेक सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात.
आधार अपडेट स्थिती तपासण्यासाठी प्रक्रिया:
- स्टेप 1: UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/en/ वर जा.
- स्टेप 2: लॉगिनवर क्लिक करून X-ray आधार क्रमांक टाका. आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
- स्टेप 3: डॅशबोर्ड उघडल्यानंतर ‘माय आधार’ सेक्शनमध्ये ‘चेक आधार अपडेट स्टेटस’ पर्याय निवडा.
- स्टेप 4: ‘SRN’ (सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर) टाका आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. स्क्रीनवर तुमच्या आधार अपडेटची स्थिती दिसेल.
14 डिसेंबरनंतर आकारले जाईल शुल्क
UIDAI ने 14 डिसेंबर 2024 ही मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख जाहीर केली आहे. यानंतर आधार अपडेटसाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे सर्वांनी वेळेत आधार अपडेट करणे गरजेचे आहे.