नवीन बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्याची सोपी प्रक्रिया, Bandhkam Kamgar Smart Card Apply Online

2 Min Read
Bandhkam Kamgar Smart Card Apply Online Maharashtra

Bandhkam Kamgar Smart Card Maharashtra: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड (Construction Worker Smart Card) खूप महत्वाचे आहे. या स्मार्ट कार्डचा उपयोग विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो. निवडणुकीदरम्यान असलेल्या आदर्श आचार सहिंतेमुळे नवीन स्मार्ट कार्डसाठी अर्ज घेणं थांबवण्यात आलं होत पण आता निवडणुकीनंतर पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Learn how to obtain a Construction Worker Smart Card in Maharashtra. Get information on the application process, required documents, and the benefits like housing schemes, marriage grants, scholarships, and more).

या स्मार्ट कार्डमुळे कामगारांना घरकुल योजना, मुलीच्या लग्नासाठी ₹51,000 अनुदान, सुरक्षा संच, किचन सेट, आणि इतर फायदे मिळतात.  

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसं मिळवावं?

या कार्डासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:  

  1. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र  
  2. आधार कार्ड  
  3. स्वयंघोषणापत्र  
  4. बँक पासबुक  

अर्ज सादर केल्यानंतर, 1 रुपयाचा पेमेंट करून अर्ज सक्रिय करावा लागतो. नंतर काही महिन्यांत तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळते.  

बांधकाम कामगार स्मार्ट कार्डचे फायदे

  • विमा योजना, यासह बांधकाम कामगारांसाठी असलेल्या ईतर योजनांचा लाभ
  • घरकुल योजना  
  • 51 हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी  
  • अपघाती मृत्यूवर आर्थिक सहाय्य  
  • कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती 
  • विमा योजना, यासह बांधकाम कामगारांसाठी असलेल्या ईतर योजनांचा लाभ
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now