Majhi Ladki Bahin Yojana Application Rejected: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे कोट्यवधी महिलांना लाभ झाला आहे. मात्र, सध्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून त्यात अनेक अर्ज बाद झाल्याचे समोर आले आहे. (Majhi Ladki Bahin Yojana: Thousands of applications rejected in Pimpri-Chinchwad; check eligibility and next steps for reapplication and scheme benefits).
Majhi Ladki Bahin Yojana Verification : किती अर्ज वैध, किती बाद?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भागातून एकूण ४,३२,८९० अर्ज दाखल झाले. त्यापैकी ३,८९,९२० अर्ज वैध ठरले असून, त्या अर्जधारक महिलांच्या बँक खात्यात पाच हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, ४२,४८६ अर्ज बाद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार कोणत्या भागात किती अर्ज बाद झाले
- निगडी क्षेत्रीय कार्यालय: १०,८२९ अर्ज बाद.
- ड क्षेत्रीय कार्यालय: ७,६२३ अर्ज बाद.
- अन्य भागांमध्ये अर्ज वैध आणि अवैध ठरण्याचे प्रमाण योजनेच्या निकषांवर आधारित आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल की, अपूर्ण माहिती किंवा अयोग्य कागदपत्रे असल्याने अर्ज अवैध ठरत आहेत.
पात्र असूनही पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी
महिलांना योजनेचा लाभ नेमका किती तारखेला मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभ थांबवण्यात आला असून, काही महिला पात्र असूनही त्यांच्या खात्यात जुलै पासूनच्या एकाही हफ्त्याची रक्कम जमा झाली नाही. यामुळे अशा महिलांमध्ये नाराजी आहे आणि त्या लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.