लाडक्या बहिणींनो 3 मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी करा हे काम Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary

2 Min Read
Free Gas Cylinder Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Ekyc Deadline

Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary : महाराष्ट्र सरकारच्या (Mukhyamantri Annapurna Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी (Pm Ujjwala Yojana) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबाना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे. आणी लवकरात लवकर (e-kyc) ई-केवायसी करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबासोबतच भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी देखील मोफत रेशनच्या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करण्याची सरकारने मुदत दिली आहे.

जर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमचे रेशन कार्ड ई-केवायसी केले नाही. तर तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळणार नाही. तसेच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही 3 मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच तुम्ही ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी करून घ्या.

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल.

🔴 हेही वाचा 👉 पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहेत पात्रतेच्या अटी?.

रेशन दुकानात जाताना तुम्हाला तुमचे रेशन कार्ड, त्याची एक झेरॉक्स प्रत आणि आधार कार्ड सोबत न्ह्यावे लागेल. आणी रेशन दुकानात गेल्यानंतर, तुम्हाला रेशन डीलरला सांगावे लागेल की तुम्हाला तुमचे रेशनकार्ड ई-केवायसी करायचे आहे. यानंतर, रेशन डीलर पीओएस मशीनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांचे ठसे घेऊन ई-केवायसी करेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article