Free Silai Machine Yojana 2025: भारत सरकारने श्रमिक वर्गातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये महिलांसाठी ‘फ्री सिलाई मशीन योजना’ (Mofat Silai Machine Yojana) हा एक मोठा उपक्रम आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेतून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळणार आहे. (Learn about the Free Silai Machine Yojana – eligibility, benefits, required documents, and how to apply online. Empower women with financial aid and skill development through this scheme).
मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट
Free Silai Machine Yojana Benefits Eligibility Online Application: फ्री सिलाई मशीन योजनेचा उद्देश श्रमिक वर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आहे. पहिल्या टप्प्यात सरकारकडून 50,000 महिलांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 10 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्याद्वारे त्या सिलाईचे कौशल्य आत्मसात करू शकतील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र आणि आर्थिक प्रोत्साहनही दिले जाईल.
योजनेसाठी पात्रता:
- अर्ज करणारी महिला भारतीय नागरिक असावी.
- वय: 18 ते 40 वर्षे.
- वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- श्रमिक वर्गातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे:
- रहिवासी दाखला
- जात्याचा दाखला
- उत्पन्न दाखला
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- बीपीएल कार्ड
योजनेचे फायदे:
- महिलांना रोजगार मिळवण्यासाठी मदत.
- प्रशिक्षणाद्वारे कौशल्यविकास.
- 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन थेट बँक खात्यात जमा.
- आर्थिक परिस्थितीत सुधारणा करून महिलांना स्वावलंबी बनवणे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- योजनेचा फॉर्म उघडा.
- आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
- आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट करा.
महिलांसाठी सुवर्णसंधी!
फ्री सिलाई मशीन योजना महिलांना कौशल्य मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांना नवे पंख द्या.