Pan Card Download Marathi: पॅन कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे, जे आयकर विभागाकडून जारी केले जाते. अनेक वित्तीय आणि कायदेशीर कामांसाठी पॅन कार्डची आवश्यक असते. अनेक वेळा पॅन कार्ड गहाळ होणे किंवा वेळेवर न सापडणे अशा कारणास्तव आपली महत्वाची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. अशा वेळी तुम्ही घरबसल्या फक्त 5 मिनिटांत पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. आणी हे डाउनलोड केलेले पॅन कार्ड वापरून तुमचे काम करू शकता. या लेखात, येथे आपण पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक बाबी:
- आधार कार्ड
- आधारशी लिंक मोबाइल नंबर
- इंटरनेट असलेला स्मार्टफोन किंवा कंप्युटर
पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
- आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
- होमपेजवरील ‘Instant e-pan card’ पर्यायावर क्लिक करा.
- ‘Get new pan card’ या पर्यायावर क्लिक करा.
- आधार नंबर ची माहिती भरा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी भरा आणि आधार तपशील सत्यापित करा.
- त्यानंतर ‘PAN PDF’ पर्यायावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
- काही सेकंदात आपले ई-पॅन कार्ड ईमेलवर पाठवले जाईल.
- ईमेलमध्ये जाऊन पॅन कार्ड डाउनलोड करा.
पॅन कार्ड डाउनलोड करण खूप सोप आहे तुम्ही ते घरबसल्या कधीही डाउनलोड करू शकता.