Aadhar Card : नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक करण खूप सोप आहे, येथे जाणून घ्या पद्धत

2 Min Read
🔴 हे वाचलं का?🤞

How to Update Mobile Number in Aadhar Card : आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा : ओळखपत्र ते बँकेशी संबंधित कामांपर्यंत आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड (Aadhar Card) असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ते प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. अनेक कारणांसाठी आधारशी लिंक केलेला ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येत असतो परंतु जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर बदलला असेल तर त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुमची कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच मोबाईल नंबर बदलताच आधार कार्डवर देखील नवीन नंबर तातडीने अपडेट करणे गरजेचे आहे. 

आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा ते जाणून घ्या

कोणत्याही कारणास्तव तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही ते खालील प्रकारे करू शकता.

  • 1: यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटावे लागेल.
  • 2: यानंतर त्यांच्याकडून आधार अपडेट फॉर्म घेऊन भरून द्यावा लागेल. या फॉर्मच्या मदतीने आधार कार्डवर तुम्ही तुमचा नवीन मोबाइल नंबर अपडेट करू शकता.
  • 3: फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, पूर्ण नाव इत्यादी इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • 4: फॉर्म व्यवस्थित भरून त्यांच्याकडे द्या त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातील ज्यामुळे तुमची ओळख होईल. त्याचबरोबर तुमचा एक फोटो देखील क्लिक केला जातो आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची विनंती स्वीकारली जाते.
  • 5: आणि काही दिवसात नवीन मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला जातो.

How to update mobile number in aadhar card online | आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर ऑनलाईन कसा अपडेट करायचा?

आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र असून त्यावर असणारा मोबाईल नंबर हा इतर अनेक ठिकाणी लिंक असतो, जसं की बँक खाते, pf खाते.. इत्यादी. यासाठी त्याचा गैरवापर होऊ नये या कारणास्तव तुम्ही आधार कार्डवरील मोबाईल नंबर ऑनलाइन बदलू शकत नाही. ( you cannot change the mobile number in aadhar card online).

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article