लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! या पाच प्रकारच्या अर्जांची होणार स्क्रुटिनी – अदिती तटकरे Important Update On Majhi Ladki Bahin Yojana 2025 Five Types Of Applications To Be Scrutinized

2 Min Read
Important Update On Majhi Ladki Bahin Yojana 2025 Five Types Of Applications To Be Scrutinized

Important Update On Majhi Ladki Bahin Yojana 2025 Five Types Of Applications To Be Scrutinized: महाराष्ट्र सरकारने आज 2 डिसेंबर 2024 रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी घोषित केल. परंतु आता या योजनेबाबत आणखीन एक महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे. (Important update on the Ladki Bahin Yojana 2025! Applications from five categories will undergo scrutiny, including income above 2.5 lakh, four-wheeler ownership, and more).

महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया स्पष्ट केली आहे. ‘सर्व अर्जांची सरसकट स्क्रुटनी केली जाणार नाही,’ अस मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, काही अर्जांमध्ये तक्रारी आल्यामुळे त्यांची पडताळणी केली जाणार आहे.

योजनेसाठी खालील 5 विशेष प्रकारच्या अर्जांची स्क्रुटनी केली जाणार आहे:

  • 1) ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तरी देखील योजनेचा लाभ घेत आहेत, अशा अर्जांची पडताळणी.
  • 2) ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे, अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी.
  • 3) एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत, अशा अर्जांची तपासणी.
  • 4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी.
  • 5) आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी.

अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे की, मूळ शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. या प्रक्रियेमुळे फसवणूक आणि चुकीच्या अर्जांची ओळख पटवून योजनेची पारदर्शिता वाढवली जाईल.

हे निर्णय आणि बदल नवीन वर्षात माझी लाडकी बहीण योजनेला (Mazi Ladki Bahin Yojana 2025) अधिक प्रभावी बनविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महिलांसाठी हि योजना अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारच्या या कडक उपायांच स्वागत करण्यात येत आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now