Ladki Bahin Yojana 6th Installment Update: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजन आहे, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. सध्या, लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्या बाबत सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे, ज्यात सांगितले जात आहे की येत्या 24 तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये जमा होणार आहेत. मात्र, ही माहिती खोटी आहे. (Latest update on the 6th installment of Maharashtra’s Ladki Bahin Yojana. Rumors claim ₹2100 will be transferred within next 24 hours, but there’s no such official announcement).
सत्य काय आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी एक घोषणा केली होती की, “नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम ₹१५०० वरून ₹२१०० केली जाईल.” (नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर) परंतु, सध्या सोशल मीडियावर अफवा पसरली आहेत की येत्या 24 तासात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात ₹२१०० जमा होणार आहेत, जे खरे नाही.
आधिकारिक माहिती काय आहे?
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवण्याची योजना आहे. लवकरच यावर अधिकृत बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर, महिलांना दरमहा ₹२१०० च्या सहाय्याची शिफारस केली जाऊ शकते.
महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सध्या ₹१५०० देण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. योजनेच्या ताज्या अपडेटसाठी अधिकृत सरकारी स्त्रोत तपासा.
ज्या महिलांनी (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला होता आणि त्यातील त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात 6व्या हफ्त्याची रक्कम जमा केली जाईल. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे, ते नसल्यास खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळेच तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला असल्याचा मेसेज आला असल्यास तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असल्याची खात्री करा.